Sunday, April 23, 2006

जागतिक पुस्तक दिन आणि द्विशतकपूर्ती

आज २३ एप्रिल - शेक्सपिअरचा जन्मदिन आणि मृत्युदिनही. जागतिक पुस्तक दिनाला याहून अधिक चांगला मुहूर्त कोणता? आपल्यापैकी बहुतेक सर्वांना थोडीफार वाचनाची आवड असतेच, पण वाचनाचे वेड अगदी रेल्वेचे वेळापत्रक किंवा बांधून आलेला पुडीचा कागद वाचण्यापर्यंतदेखील जाते. सॉमरसेट मॉमच्या 'बुक बॅग' कथेतील सुरुवातीची ही वाक्ये, त्यातील शब्दरचनेमुळे लक्षात राहतातच पण याच व्यसनाची कबुलीही देतात.

Some people read for instruction, which is praiseworthy, and some for pleasure, which is innocent; but not a few read from habit, and I suppose that this is neither innocent nor praiseworthy. Of that lamentable company am I.
[पुढील मजकूर येथे वाचता येईल.]

उत्सवी वृत्ती आणि दिवस साजरे करायच्या संदर्भातच बोलायचे झाले तर, सध्याचे वर्ष हे मराठी छापील साहित्याचे द्विशतकपूर्ती वर्ष आहे. १८०५ साली बंगालमधल्या श्रीरामपूर येथील मिशनरी छापखान्यात देवनागरी टाइप वापरून दोन मराठी पुस्तके प्रकाशित झाली. एक होते, 'अ ग्रामर ऑफ महरट्ट लँग्वेज' व दुसरे 'मॅथ्यूचे शुभवर्तमान' - म्हणजेच बायबल.

आता या मितीला, दोनशे वर्षाँनंतर मराठीत दरवर्षी दीड हजाराहून अधिक पुस्तके प्रकाशित होत आहेत. दिवाळी (आणि काही वासंतिक अंक) पकडले तर ही संख्या दोन हजाराच्या पलीकडे जाते. इतक्या मोठ्या संख्येने मराठी पुस्तके छापली जातात, त्याअर्थी त्यांचा खपही होत आहे; वाचकवर्ग विस्तारतो आहे. मग त्यात विद्वज्जड समीक्षाही आली आणि 'मधल्या वेळी खायला काय कराल?' पासून 'काळ्या डोहाचे रहस्य' हेही आले. यातला विनोदाचा भाग सोडला, तर 'बदलता भारत' सारखे जागतिकीकरणाचा वेध घेणारे, 'इडली, ऑर्किड आणि मी' हे उद्योजकाची कहाणी सांगणारे आणि 'रानातल्या वाटा' (किंवा 'इजिप्तायन') सारखे वेगळ्या विश्वातील भ्रमंतीचे अनुभव कथन करणारे अशी वेगवेगळी पुस्तके जवळपास एकाच वेळी वाचकांनी उचलून धरावीत हे त्यांच्या प्रगल्भतेचेच निदर्शक आहे आणि एकंदर साहित्यव्यवहारासाठी सुचिन्ह आहे.

अर्थात, या सार्‍या गोष्टींमध्ये हुरळून जाण्यासारखे काही नसले तरी 'मराठी भाषा मुमूर्षू आहे काय?' या इतिहासाचार्य राजवाड्यांच्या प्रश्नाला 'नाही' हे ठाम उत्तर देता येण्याइतपत नक्कीच आशादायक चिन्हे दडलेली आहेत.

8 comments:

Sumedha said...

या सुंदर नोंदीबद्दल धन्यवाद! तुमच्या नोंदी नेहेमीच महितीपूर्ण तरीही मनोरंजक असतात!

शमा said...

Nandan chhan post aahe.
mi Book Shelf mhanun ek blog open kela ahe to jarur bagh. (btw to blog mala majhya sadhyachya blog chya profile madhe ch kasa dakhavata yeiil? mi to separate open kela ahe. tyamule tithe disat nahi.)

शैलेश श. खांडेकर said...

सुरेखच!

Priyabhashini said...

Good Post...incidently I was reading somethings yesterday and would like to share.

1. The Raja of Tanjore got the first English Book translated to Marathi in 1817. To my knowledge this king is Serfoji II (descendant of Shivaji Maharaj.

He had deep interest in reading and set up a library named Saraswati Mahal Library. He purchased thousands of books from abroad, read and preserved them in his library

For more info : http://en.wikipedia.org/wiki/Serfoji_II

2. First Marathi newspaper was started in 1835 (unfortunately I couldnt get its name)

Vishal said...

नंदन,
ब-याच दिवसांनंतर ब्लॉग वाचला.
नेहमीप्रमाणेच अतिशय माहितीपूर्ण नोंद आहे. तुला 'संभाजी' तिथं कसं काय मिळालं? की भारतातून मागवून घेतलंस?

Nandan said...

आपल्या प्रतिक्रियांबद्दल आभार. शमा, तुमचा नवीन ब्लॉग छान आहे. कोबाल्ट ब्ल्यूचे परीक्षण आवडले. तुमच्या प्रश्नाचे उत्तर मी त्यावरच्याच एका प्रतिक्रियेत देण्याचा प्रयत्न केला आहे. सर्फोजी राजांबद्दलच्या अधिक माहितीबद्दल आभार, प्रियभाषिणी. मला वाटते, पहिले मराठी वृत्तपत्र म्हणजे बाळशास्त्री जांभेकरांचे 'दर्पण'. त्याच्या आधी १० वर्षे गुजरातीतून 'मुंबई समाचार' सुरू झाले होते, जे अजूनही चालू आहे. (अर्थात, गटेनबर्गने छपाईचा शोध लावला तो १४५० साली. ४०० वर्षांपेक्षा जर ४ किंवा ४० वर्षांत हे तंत्रज्ञान भारतात पोचले असते, तर त्याचा किती दूरगामी परिणाम झाला असता.)

विशाल, हो भारतातून थोडी पुस्तकांची 'रसद' मागवून घेतली त्यातच 'संभाजी' पण होते. तुला जपानमध्ये पुस्तके हवी असतील तर कदाचित हे (www.rasik.com) संकेतस्थळ उपयुक्त ठरू शकेल.

Kaustubh said...

Try Ex-Libris, confessions of a common reader - pustakveDee loka kashee astaat tyacha surekh literary anthology ahey!

joshi said...

Nandan,
Namaskar,
I am unable to view Devnagari?
Can U help?