इंडिब्लॉगतर्फे नुकत्याच झालेल्या स्पर्धेत माझा हा मराठी साहित्यावरील ब्लॉग सर्वोत्कृष्ट मराठी ब्लॉग म्हणून निवडण्यात आला.
यानिमित्ताने मी सर्व वाचकांचे आणि सह-ब्लॉगर्सचे आभार मानू इच्छितो. आपण वेळोवेळी माझ्या ब्लॉगला भेट देत रहाल आणि आपल्या प्रतिक्रिया नोंदवत रहाल अशी आशा करतो.
कृत्रिम विनय म्हणून म्हणत नाही, पण यात माझा वाटा तसा फार कमी आहे. मी केवळ मराठी साहित्यात जे जे मला आवडले ते ते येथे मांडत गेलो. मी जेव्हा हा ब्लॉग सुरु केला तेव्हा अगदी थोडे मराठी ब्लॉग्ज मला माहीत होते आणि त्यामुळे याला कितपत प्रतिसाद लाभेल अशी शंका होती. परंतु, गेल्या सहा महिन्यात सुमारे ३५०० हून अधिक वेळा या ब्लॉगला नेटकरांनी भेट दिली आणि ही शंका निराधार ठरवली.
मराठी ब्लॉगविश्वाचे तर आम्ही समस्त मराठी ब्लॉगर्सनी विशेष आभार मानले पाहिजेत. या व्यासपीठामुळेच नवनवीन मराठी ब्लॉग्जची माहिती मिळते, वाचकांनाही एकाच जागी नवीन लेख कुठल्या ब्लॉगवर प्रसिद्ध झाला आहे याची माहिती मिळते आणि शिवाय स्वतःचा ब्लॉग सुरु करायची प्रेरणा मिळते. गेल्या काही दिवसांत झपाट्याने जे नवीन मराठी ब्लॉग्ज सुरू झालेले आहेत, ते या विधानाला पुष्टीच देतील. या संकेतस्थळाबद्दल पवन आणि देबाशिष यांचे विशेष आभार.
Monday, January 16, 2006
Subscribe to:
Post Comments (Atom)

13 comments:
नंदन तुझे अभिनंदन
( जरा जास्तच rhyme होतय वाक्य :-P )
सही रे भिडू ..
अभि-नंदन !
Dear Nandan,
Hi!!!
hearty Congratulations.
अभिनंदन. Great work. Keep it up.
अभिनंदन मित्रा. तू आपल्या आयुष्यात सतत यशस्वी होत रहा.
Hi Congrats
it's so soothing to read just exquisite blog in one's mothertongue.
I tried to put marathi font using Baraha but i still dont know how to use it !!
regards
milind
ट्युलिप, ज्युपिटर, maldini, निखिल, दिनेश व मिलिंद; आपल्या प्रतिसादाबद्दल आणि शुभेच्छांबद्दल आभारी आहे. मिलिंद, जर तुम्हांला मराठीत लिहिण्याबद्दल काही मदत हवी असेल, तर मला जेवढे माहीत आहे तेवढे नक्कीच सांगू शकेन. सर्वात सोपा उपाय म्हणजे www.manogat.com या संकेतस्थळावर जाऊन तेथे लिहिणे आणि प्रकाशित न करता तुमच्या जालनिशीवर (ब्लॉगवर) चिकटवणे.
प्रिय मित्रा,
अब्लॉग गोष्टीचा इथे उल्लेख करत असल्याबद्दल क्षमस्व! माझ्या एका अमराठी मैत्रिणीला आधुनिक मराठी दलित साहित्यावर dissertation करावयाचे आहे. ती मद्रासमध्ये आहे. तू किंवा अन्य जाणकार तिला मदत अथवा यथाशक्ती मार्गदर्शन करू शकाल का? तिचा shriya.bubna@gmail.com धन्यवाद!
अभिनन्दन ब्लॊग खरच छान आहे.
Hi nandan,
Congratulations upon your success ! It is really a nice blog - Content Rich and Well Designed. मराठी साहित्यातील वेचक-वेधक मौक्तिके वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे...
मी पहिलान्दा मराठी भाशेत लिहितो. ज़र चूक झाले तर मला माफ़ करा. नंदन इंडिब्लॊगिस मधे तुला पुरस्कार भेट्ला हे ऐकुन मी खूप खुश झालो. तुला भविश्या साठी माझी शुभेच्छा!
Hi Nandan,
I saw your blog only after you got the award. This is the best marathi blog I have come across and you completely deserved the award. Keep it up.
Ameya
आशिष, रजनीगंधा, पामर, सुधांशू आणि अमेय; आपल्या शुभेच्छांबद्दल मनःपूर्वक आभार (आणि इतक्या विलंबाने आभार मानतोय त्याबद्दल क्षमस्व.)
Post a Comment