Thursday, December 29, 2005
अंतर्नाद
अंतर्नाद या मराठी मासिकाबद्दल अतिशय चांगले अभिप्राय मनोगत या संकेतस्थळावर वाचायला मिळाले. परदेशातही हा अंक मिळू शकेल काय अशी विचारणा केली असताना, त्याच्या संपादकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला. दिवाळी अंकासहित वार्षिक वर्गणी ३६० रूपये आणि टपालखर्च वार्षिक ५०० रूपये, एवढ्या किंमतीत हे मासिक तुमच्या घरी पोहोचू शकेल. चलनविनिमयाच्या दराच्या दृष्टीने पाहिले तर युरोप- अमेरिकेत ८६० रूपये म्हणजे अवघे २० युरोज/डॉलर्स. वर्षभराच्या दर्जेदार वाचनासाठी ही रक्कम नक्कीच जास्त नाही. यासंबंधी अधिक माहिती आपण या दुव्यावर वाचू शकता.
Subscribe to:
Post Comments (Atom)

0 comments:
Post a Comment